हवेतूनही पसरतो कोविड विषाणू; अमेरिकेच्या संस्थेचे शिक्कामोर्तब

0

- Advertisement -

अमेरिकेच्या रोग नियंत्रक आणि प्रतिबंधक संस्थेने(सीडीसी) कोविड – 19 विषाणूचे हवेद्वारे संक्रमण होत असल्याचे मान्य केले आहे.

लोक बोलत असताना श्वासोच्छसाद्वारे काही प्रमाणात द्रव सोडतात जे हवेतल्या अगदी सुक्ष्म अशा कणांच्या पृष्ठभागावर स्थिर राहतात. विषाणू हा अत्यंत सुक्ष्म, एअरोसोलाइज्ड कणांद्वारे वाहून नेला जाऊ शकतो व असे कण इतर लोकांच्या श्वसनाद्वारे शरीरात गेल्याने लोकांना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, असे  यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन या संस्थेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.

गेल्या वर्षभरापासून जगभरातील अनेक आरोग्य तज्ञांनी दिलेल्या इशा-यानंतर सीडीसी या संस्थेने संकेतस्थळावर दिलेल्या एका निवेदनात कोरोना विषाणूबद्दलच्या मार्गदर्शक तत्वांत सुधारणा केली असल्याचे स्पष्ट केले आहे.

“गर्दी असलेल्या घरातील जागांमध्ये कोरोना विषाणू हवेतच राहील, जेथे “शॉर्ट-रेंज एरोसोल ट्रान्समिशन… नाकारता येत नाही,” असे प्रारंभिक नकारानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जुलै २०२० मध्ये मान्य केले होते.

- Advertisement -

विषाणू अनेक मार्गांनी प्रसारीत होऊ शकतो तसेच बंद जागेत सहा फूट अंतरावरही लोक संक्रमित होऊ शकतात. हवा खेळती ठेवणे (वेंटिलेशन) आणि हवा खेळती ठेवण्यासाठी केलेले विशिष्ठ उपाय यामुळे प्रसारास आळा बसू शकेल असे जगभरातील रोगतज्ज्ञांनी अनेकदा स्पष्ट केले होते.

 

सीडीसीने स्पष्ट केलेले महत्वाचे मुद्दे –

कोविड – 19 विषाणू हा वायुजनित आहे आणि श्वसन दरम्यान सोडल्या गेलेल्या अतिशय बारीक एरोसोलिज्ड कणांद्वारे प्रसारित केला जाऊ शकतो.

लोक श्वसनाद्वारे काही द्रव उत्सर्जित करतात जे जवळपासच्या हवेच्या कणातील पृष्ठभागावर स्थिर राहतात.

मोठे थेंब काही सेकंद ते काही मिनिटांतच हवेतून नष्ट होऊ शकतात परंतु अगदी सुक्ष्म थेंब आणि एरोसोलचे कण काही मिनिटांपासून काही तासांपर्यंत हवेत राहू शकतात.

संसर्गजन्य स्त्रोतापासून सहा फूट अंतरावर श्वसनाद्वारे संसर्ग होण्याची शक्यता कमी असते, परंतु संसर्गजन्य व्यक्ती घरामध्ये वा बंद जागेत १ मिनिटांपेक्षा जास्त वा काही तासांच्या कालावधीसाठी राहील्यास इतर जे लोक बंद जागेत वा घरात सहा फूट अंतर दूर असले तरीही त्यांना संक्रमित करतात.

इंग्लंड, अमेरिका आणि कॅनडाच्या सहा तज्ञांच्या एका गटाने गेल्या महिन्यात लॅंन्सेट या आरोग्य विषयक संशोधन पत्रिकेत कोरोना विषाणू मुख्यत: हवेत प्रसारित होत असल्याचा दावा करीत केला  होता. आता सीडीसीने आपल्या कोरोना विषयीच्या मार्गदर्शक सूचना जवळपास एक महिन्यानंतर अद्ययावत केल्या आहेत.

जगभरात होत असलेल्या काही संसर्गाच्या प्रकरणांचा अभ्यास करता गर्दी असलेल्या घरांमध्ये, तसेच हवा खेळती राहण्यास कमी वाव असलेल्या ठिकाणांमध्ये काही “एरोसोल संक्रमणाची शक्यता” असलेले संसर्ग दिसून येत असल्याची शक्यता नाकारता येत नाही असे म्हटले होते.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.