चीनमध्ये जोडप्यांना 3 मुलांना जन्म देण्याची परवानगी, चीन सरकारची घोषणा

0

- Advertisement -

बीजिंग: चीनने त्यांच्या अपत्य विषयी कायदयामध्ये मोठा बदल केला आहे. चीनने आता जोडप्यांना 3 अपत्यांना जन्म देण्याची परवानगी दिली आहे. यामुळे आता तेथील लोक 3 मुलांना जन्म देऊ शकतात. चीनने लोकसंख्या नियंत्रणासाठी फक्त एक मूल कायदा लागू केला होता.

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पॉलिट ब्युरो बैठकीत या बदलास मान्यता देण्यात आल्याची माहिती चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने दिली आहे.

2016 मध्ये चीनने एक मूल कायदा (One Child Policy)  रद्द करून 2 मूल जन्माला घालण्यास परवानगी दिली होती. चीन मध्ये श्रमिक लोकांची संख्या कमी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता, मात्र, यामुळे सुद्धा लोकसंख्या वाढीचा दर फार कमी राहिला. चीनमध्ये सध्या मनुष्यबळ कमी पडत असल्याने सरकार चिंतित आहे.

- Advertisement -

चीनमधील लोक एका पेक्षा जास्त अपत्यांना जन्म घालण्यास मुरड घालतात

1980 मध्ये चीनने लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी काही जन्म मर्यादा (वन चाइल्ड पॉलिसी) घातल्या होत्या, परंतु आता देशात कष्टकरी वर्गाची संख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे समृद्ध अर्थव्यवस्था बनवण्याच्या प्रयत्नात अडथळे येत आहेत. सध्या चीनमध्ये जन्म मर्यादेच्या धोरणात सवलत दिली गेली आहे, परंतु महागाई, छोटे घर आणि बायकांसोबत नोकरीमध्ये होणार्‍या भेदभावास पाहून जोडपे एका पेक्षा जास्त अपत्यांना जन्म घालण्यास मुरड घालतात.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.