चीनमध्येही ShutDown: वीज उत्पादनातील अनेक कंपन्यांना लागेलय टाळे, उत्पादन घटीचा अंदाज

0

- Advertisement -

बिजींग: चीनमधील नागरिक आणि उद्योगधंद्यांना सध्या विजेच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. सरकारी कामकाजासाठी मोठ्या प्रमाणावर वीज पुरवठा वापरण्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी अनेक औद्योगिक तसेच रहिवासी क्षेत्रात शटडाऊन अर्थात वीज कपात केली जात आहे. यामुळे अनेक कारखाने बंद झाले आहेत तर अनेक घरांमध्ये अंधार आहे. ह्या वीज कपातीच्या संकटाने चीनच्या औद्योगिक उत्पादनाला फटका बसला असून जागतिक पातळीवर ख्रिसमस आधी स्मार्टफोन आणि इतर सहाय्यक उपकरणांच्या पुरवठ्यांमध्ये तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.

चीनची सरकारी वृत्तवाहिनी सीसीटीव्हीने म्हटले आहे की, ईशान्य चीन मधील लियाओयांग शहरात 23 लोक विषारी वायू गळतीने आजारी पडले कारण तेथील धातूच्या कारखान्यातील वीज बिघाडामुळे एअर कंडिशनर बंद होते. या घटनेत कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही.

विजेचा कार्यक्षम वापर वाढवण्यासाठी अनेक कारखाने मर्यादेपेक्षा जास्त वीज वापरल्याबद्दल बंद करण्यात आले आहेत.

स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून शांघाय शहराच्या पश्चिमे भागातील एका कारखान्यात उत्पादन थांबवावे लागले असल्याचे Apple iPhones या जगप्रसिद्ध स्मार्ट फोन उत्पादक कंपनीच्या एका पुरवठादार उत्पादकाने म्हटले आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष आर्थिक वाढ आणि प्रदूषणाच्या समस्येत संतुलन राखण्याच्या चिंतेत, चीन सरकार उत्पादन उद्योगाला ऐन व्यावसायिक भरभराटीच्या काळात बंद करीत आहे.

- Advertisement -

दरम्यान ऊर्जा-बचतीचे चीनच्या ध्येयात दीर्घकालीन लाभ होऊ शकतो, परंतु जास्त किंमत मोजावी लागेल. असे टिंग लू, लिशेंग वांग आणि जिंग वांग या अर्थशास्रज्ञांचे म्हणणे आहे.

चालू आर्थिक तिमाहीत चीनच्या आर्थिक वाढीवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. चीनने सद्य तिमाहीतील आपला विकासदराचा अंदाजात मागील वर्षीपेक्षा (5.1 टक्के) घट करून तो 4.7 टक्के इतका केला आहे. तसेच वार्षिक वाढीच्य दरातही घट करून तो 7.7 टक्के इतका करण्यात आला आहे, असेही या अर्थशास्रज्ञांनी म्हटले आहे.

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.