धक्कादायक: फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या मारली थोबाडीत, पहा व्हिडीओ

0

- Advertisement -

पॅरीस: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्मानुएल मैक्रोन हे दक्षिण फ्रांसमधील एका प्रदेशात दौऱ्यावर असता दरम्यान गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तिने त्यांना थप्पड लगाविण्याची घटना घडली. मैक्रोन यांच्या सुरक्षारक्षकांनी तत्काळ थप्पड लगावणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. दरम्यान, थप्पड मारणारा व्यक्ती आणि त्याच्यासोबतच आणखी एका अशा दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोन्ही व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

BFM News या वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (8 जून) घडली. राष्ट्राध्यक्ष इम्मानुएल मैक्रोन दक्षिण फ्रांसमधील दौऱ्यादरम्यान सुरक्षा कवचालीकडे असलेल्या जनतेशी हस्तांदोलन करीत प्रत्यक्ष भेटत होते. या वेळी एका व्यक्तीने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला असता मैक्रोन यांनीही त्या व्यक्तीस हस्तांदोलन केले. या वेळी सदर व्यक्तीने राष्ट्राध्यक्षांचा हात पकडून उजव्या हाताने जोरदार थप्पड लगावली. दरम्यान, थप्पड लगावणाऱ्या व्यक्तीने तोंडाला मास्क लावलेला होता.

दरम्यान, इम्मानुएल मैक्रोन यांच्या काही सुरक्षारक्षकांनी झडप घालून सदर व्यक्तीस ताब्यात घेतले. तसेच, काहींनी इम्मानुएल मैक्रोन यांना जनतेपासून तत्काळ दूर आणि सुरक्षीत ठिकाणी नेले. दरम्यान, इम्मानुएल मैक्रोन यांची सुरक्षा पाहणाऱ्या विभागानेही त्यांना थप्पड मारण्याचा अज्ञाताकडून प्रयत्न झाल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी जुलै मध्येही मॅक्रान आणि त्यांच्या पत्नी पॅरिसमधील एका बागेत फेरफटका मारीत असताना एका गटाने त्यांना अर्वाच्य भाषेतून अपमानित केले होते.

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.