एक कोरोना रुग्ण सापडला आणि ‘या’ देशाने केलं पुन्हा पुर्ण ‘लॉकडाउन’

0

- Advertisement -

मागच्या वर्षी कोरोनाने सम्पूर्ण जगात हाहाकार माजवला होता. कित्येक देशामध्ये कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. सर्वच देशांची व्यवस्था कोरोनाने उलथवून टाकली होती. न्यूझीलंड ने मात्र योग्य अशी उपाययोजना करून कोरोना आपल्या देशात आटोक्यात ठेवला होता. न्यूझीलंड का सर्वप्रथम लॉकडाउन अनलॉक करणारा देश होता. यामुळे न्यूझीलंड चे पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांचे सर्वत्र कौतुक झाले होते. परंतु आता देशात एक कोरोना रुग्ण सापडल्यामुळे पुन्हा लॉकडाउन लागू केल जाणार आहे.

इतक्या दिवसांचा असणार लॉकडाउन

बुधवारपासून न्यूझीलंड मध्ये तीन दिवसांचा कडक लॉकडाउन लावण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी कोरोना पेशन्ट सापडला होता त्या ठिकाणी सात दिवसांचा लॉकडाउन असणार आहे. कोरोनाने देशामध्ये पुन्हा डोकं वर करू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू असतील. शाळा, कॉलेज , दुकाने, वाहतूक हे सर्व काही बंद राहणार आहे.

- Advertisement -

कोरोना काळात न्यूझीलंड ने केल्या होता कडक उपाययोजना

१) मागच्या वर्षी २ फेब्रुवारीला फिलीपिन्समध्ये एका इसमाचा कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाला होता. कोव्हिड-19मुळे चीनबाहेर झालेला हा पहिला मृत्यू होता. पण यानंतरचे संकट न्यूझीलंड ने ओळखले आणि देशामध्ये कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केली.
२)चीनमधून येणाऱ्या न्यूझीलंड नागरिकांना १४ दिवसासाठी विलगीकरण कशात ठेवण्यात येऊ लागले. हा व्हायरस जसा जगभर आपले हाथ पाय पसरू लागला तशी इराणमधून येणाऱ्या विमानप्रवाशांवर बंदी घालण्यात आली. कारण न्यूझीलंडमधला पहिला रुग्ण इराणशी संबंधित होता.
३) नंतरच्या काळात बाहेरच्या देशातून न्यूझीलंडमध्ये दाखल होणाऱ्या सर्वांवरच, न्यूझीलंडच्या नागरिकांवरही देशात दाखल झाल्यानंतर सेल्फ आयसोलेशनमध्ये जाण्याचा नियम लावण्यात आला.
४) त्यानंतर काहीच दिवसांत पंतप्रधान आर्डन यांनी देशाची सीमा नागरिक नसलेल्या सर्वांसाठी आणि नागरिकांसाठीही बंद करण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला होता.
या अशा अनेक कडक निर्बंधामुळे न्यूझीलंड सर्वप्रथम कोरोना पासून मुक्त होणार देश ठरला होता.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.