गुगलची 135 कोटींची मदत

तर अमेझॅानचे 1500 ऑक्सिजन कॅान्सेंट्रटर्स भारताकडे रवाना

0

- Advertisement -

भारत कोरोनाच्या साथीतील सर्वात कठीण वेळेतून जात असून त्यात अनेक नागरिकांना या संकटाचा सामना करता यावा यासाठी देशातील नागरिकांना मदत म्हणून 135 कोटी रुपयांच्या मदत निधी देत असल्याची घोषणा आज गुगल या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ट्विट करून केली आहे.

मदतीचा एक हिस्सा सर्वप्रथम कोरोना संकटाने ग्रस्त असलेल्या कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन खर्चात मदत करण्यासाठी रोख स्वरुपात मदत पुरविण्यासाठी असून, दुसरा युनिसेफकडे वर्ग करण्यात येईल ज्यामुळे जिथे भारतात कमतरता आहे त्याठिकाणी ऑक्सिजन आणि चाचणी उपकरणांसह तातडीने वैद्यकीय पुरवठा करण्यात मदत होईल.

- Advertisement -

दरम्यान, अ‍ॅमेझॉन इंडियाने देखील 1500 हून अधिक ऑक्सिजन कॅान्संट्रेटर्स आणि वैद्यकीय उपकरणे खरेदी करीत असून ती ‘स्वास्थ,’ ‘कन्सर्न इंडिया’ आणि ‘एसीटी’ यासारख्या संस्थांच्या मदतीने रूग्णालये आणि वैद्यकीय सुविधांना दान म्हणून देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच 8000 ऑक्सिजन कॅान्सेंट्रटर्स आणि 500 इतर वैद्यकिय उपकरणे सिंगापूर येथून भारतात पाठविण्यात येणार असल्याचीही माहीती दिली आहे.

30 एप्रिलपर्यंत यापैकी बहुतांश सामुग्री विमानांद्वारे भारतात पोहोचण्यीच शक्यता आहे.

तसेच “भारतातील सद्यस्थितीमुळे मी मनापासून दु: खी आहे. अमेरिकन सरकार मदतीसाठी एकत्र येत आहे याबद्दल मी कृतज्ञ आहे. मायक्रोसॉफ्ट या प्रयत्नांना मदत करण्यासाठी आपल्या संसाधनांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करत राहील आणि ऑक्सिजन पुरवठ्याच्या साधनांच्या खरेदीसाठी मदत देईल, ” असे माक्रोसॅाफ्ट या जगविख्यात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी  सत्या नाडेला यांनी आज सकाळी एका ट्विटमध्ये सांगितले.

भारतीय वंशाचे, सन मायक्रोसिस्टम्स कंपनीचे सह-संस्थापक विनोद खोसला यांनीही शनिवारी ऑक्सिजनच्या विविध उपकरणांची शक्य तेवढी मदत करण्यात येईल असे सांगितले आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.