कशी ठेवली जातात वादळांची नावे, जाणून घ्या ‘तौक्टे’ चा अर्थ, कोणत्या देशाने ठेवले नाव

0

- Advertisement -

समुद्रावरील हवेचे तीव्र दबावाचे क्षेत्र चक्रीवादळ ‘तौक्टे’ रूपात बदलले असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने शनिवारी सांगितले. ‘तौक्टे’  ने 16-18 मे पर्यंत अत्यंत भयंकर चक्रीवादळाचे रूप धारण करीत आपला प्रवास गुजरातच्या दिशेने सध्या सुरु केलाय. त्याचा परिणाम आपण सध्या अनुभवत आहोतच. पण अशी वादळांना नावं कोणं देत, किंवा तशी नावं देणं त्यांना गरजेचं असते का?

कोणत्या देशाने दिले तौक्टे नाव?

मान्यमार देशाने या चक्रीवादळाला ‘तौक्टे’ नाव दिले आहे. याचा अर्थ ‘गेको’, स्थानिक भाषेत याचा अर्थ मोठा आवाज करणारी पाल आहे. भारतीय किनार्‍यावरील यावर्षीचे हे पहिले चक्रीवादळ आहे.

Gecko

कोण ठेवते वादळांचे नाव?

- Advertisement -

जागतिक हवामान संस्था (डब्ल्यूएमओ) च्या तत्वानुसार जगभर पसरलेल्या संस्थेच्या चेतावणी केंद्राद्वारे उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचे अधिकृतपणे नाव ठेवले जाते.

वादळांचे नाव का ठेवले जाते ?

उष्णकटिबंधीय चक्रीवादळे एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ टिकू शकतात, एकावेळी एकापेक्षा जास्त चक्रीवादळ येऊ शकतात. त्यामुळे वादळांना नावे देण्यात आली आहेत, जेणेकरून अंदाज लावताना वा मागोवा घेताना गोंधळ टाळता येईल. सर्वसाधारणपणे, उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना प्रांतीय पातळीवरील नियमांनुसार नावे दिली जातात.

अशाप्रकारे केले जाते नामकरण:

उत्तर हिंद महासागरातील राष्ट्रांनी सन २००० मध्ये उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या नामकरणासाठी नवीन प्रणाली वापरण्यास सुरुवात केली; अक्षर क्रम आणि तटस्थ लिंगानुसार ही नावे देशाने सूचीबद्ध केली आहेत. अशा नावांची यादी राष्ट्रीय हवामान व जलविज्ञान सेवा (एनएमएचएस) द्वारा विशिष्ट प्रदेशातील डब्ल्यूएमओ सदस्यांद्वारे प्रस्तावित केली जातात आणि संबंधित प्रादेशिक संस्थांकडून त्यांच्या वार्षिक आणि द्विवार्षिक सत्रात प्रस्तावित नावे मंजूर केली जातात, असा सर्वसाधारण नियम आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.