गुंतवणूकीची संधी; बिटकॅाईन्सचे दर 30 टक्क्यांनी पडले, एकाच दिवसात 550 अब्ज डॉलर्सचा चुराडा

0

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून क्रिप्टोकरन्सी मार्केटचा सुरू असलेला उतरता काळ अजूनही सुरूच आहे.जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिप्टोकर्न्सी बिटकॉइनच्या किंमती गेल्या 24 तासात 30 टक्क्यांपेक्षा अधिक खाली आल्या आहेत. त्याचबरोबर जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक लोकप्रिय डिजिटल चलन असलेल्या एथेरियमच्या किंमतीही या काळात 35 टक्क्यांहून अधिक खाली आल्या आहेत. त्याचबरोबर डोगेकॉइन आणि इतर बर्‍याच क्रिप्टोकरन्सींचीही तीच स्थिती आहे.

तत्पूर्वी, यापुढे आमची कंपनी पेमेंट म्हणून बिटकॉइन क्रिप्टोकर्न्सी स्वीकारणार नसल्याचे टेस्लाचे (Tesla) मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी जाहीर केले होते. यानंतर चीननेसुद्धा  बँक आणि वित्तीय संस्थांना क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजला आर्थिक सेवा देण्यास बंदी घातली आहे. यामुळे या सर्व डिजिटल चलनांच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे.या सर्व घटनांमुळे डिजिटल चलन बाजारात तब्बल 550 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

एलोन मस्क हे ट्विट्टरवर फार सक्रीय असतात. मागे काही महिन्यांपूर्वी त्यांनी डोगेकोईन (Dogecoin) या डिजिटल चलनाबद्दल ट्विट करून त्याची किंमत वाढवली होती. त्यांनी एकदा त्यांच्या ट्विट्टर बायो मध्ये Dogecoin चे सीईओ असल्याचे लिहिले होते. त्यानंतर या चलनाला प्रसिद्धी मिळाली होती. पण आता Bitcoin चलन स्विकारणार नसल्याचे जाहिर करताच डिजिटल चलन बाजारात खळबळ उडाली आहे.

परंतु डिजीटल चलन बाजारात हे काही काळापुरतेच असण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांना दर पडल्यानंतर कमी भावात अनेक डिजीटल चलने खरेदी करता येऊ शकतात. भविष्यातील चलन म्हणून या सर्व चलनांकडे पाहीले जात असल्याने, ह्या चलनांच्या भावात कमी जास्त होत राहणारच आहे असे सायबर तज्ञांनी म्हटले आहे.

डिजीटल चलन बाजारात हा आलेला उतार एक दोन आठवडे टिकून राहील त्यामुळे गुंतवणूकदारांनी ह्या चलनाची विक्री करू नये, असे अब्जाधीश माईक नोव्हाग्रेज य़ांनी म्हटले आहे.

काल बुधवारी ह्या चलन बाजाराचे भांडवली मूल्य जवळपास 1.35 ट्रिलीयन डॅालर्सने पडले आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.