मास्क घालण्यास सूट देणार्‍या इस्त्राईलमध्ये पुन्हा पसरतोय कोरोना, लस घेणाऱ्या लोकांनाही होत आहे संसर्ग

0

- Advertisement -

इस्त्राईल: मागील दीड वर्षापासून कोरोनाने जगभरात गोंधळ माजवला आहे. बर्‍याच देशात कोरोनाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या लाटेने खळबळ उडवली आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात मास्क वापरास पुर्णपणे सूट देत, असे करणारा पहिला देश असल्याचा दावा इस्त्राईलने केला होता. मात्र, याच्या एक आठवड्यानंतरच कोरोनाविषाणूने या देशात पुन्हा पाय पसरायला सुरुवात केली आहे. भारतात दुसर्‍या लाटेला कारणीभूत डेल्टा स्वरूप इस्त्राईलमध्ये लस घेतलेल्या लोकांना ही संक्रमित करत असल्याचे समोर आले आहे.

इस्त्राईल त्या देशांपैकी एक आहे ज्यांनी आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण केले आहे. यानंतर इस्त्राईलने सर्व निर्बंध हटवत नागरिकांना मास्क न घालण्यास सूट दिली होती. परंतु हा निरणी त्यांना महाग पडणार असलायचे दिसत आहे. कारण, या निर्णयानंतर अचानक नवीन कोरोना रुगाणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. कोरोना विषाणूचे खतरनाक स्वरूप डेल्टा लसीकरण झालेल्या लोकांमध्येही पसरत असल्याने प्रशासन आणि नागरिक चिंतेत आहेत. आता किशोरवयीन मुलांनाही लस देण्याची मागणी केली जात आहे.

एप्रिल महिन्यांनंतर पहिल्यांदा सापडले 125 रुग्ण

सोमवारी इस्त्राईलमध्ये 125 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण केलेल्या देशांत एप्रिलनंतर सापडलेली ही सर्वात मोठी रुग्ण संख्या आहे. इस्रायलमध्ये जानेवारीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शिगेला होता. त्यावेळी इस्रायलमध्ये दररोज 10 हजार प्रकरणे नोंदविली जात होती. परंतु त्यानंतर तत्कालीन नेतान्याहू सरकारने जलद लसीकरणाद्वारे विषाणूवर नियंत्रण प्राप्त केले होते.

- Advertisement -

इस्त्राईलमध्ये आतापर्यंत 840,079 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर या विषाणूमुळे 6,428 लोकांचा बळी गेला आहे.

 

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.