अफगाणिस्तानात तालिबानचे पुर्ण वर्चस्व, राष्ट्रपतींचे देशातून पलायन

0

- Advertisement -

काबूल: अफगाणिस्तानमध्ये Afghanistan) तालिबानने सत्ता स्थापन केली असून अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani) यांनी देश सोडला आहे. काबूल शहरात प्रवेश केल्यानंतर तालिबानने आपल्या समर्थकांना गोळीबार न करण्याचे आवाहान करीत शहरातील नागरीकांना अभय दिले होते. शांतपणे सत्तांतर करण्यावर आमचा भर आहे जनतेने घाबरुन जाऊ नये असे आवाहनही केले आहे.

दरम्यान अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani) आणि उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही अफगाणिस्तानातून पलायन केले असून ते ताजिकिस्तानला गेले असल्याचे वृत्त टोलो न्यूजच्या माहितीने एएऩआय़ ने दिले आहे.

अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यानंतर अवघ्या १०० दिवसात तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. हे सत्तातंतर शांततापूर्वक मार्गाने होत असस्याचे सांगण्यात येत आहे.

अली अहमद जलाली हे तालिबानचे पुढारी अफगाणिस्तानचे पुढचे राष्ट्रपती असल्याचे वृत्त आहे.

- Advertisement -

“काबुलमधील लूट आणि गोंधळ रोखण्यासठी तालिबान काबुलमध्ये प्रवेश करीत आहे. पोलिसांनी घाबरण्याची गरज नाही,” असं तालिबान संघटनेचे प्रवक्ता झबीनुल्लाह मुजाहिदने सांगितलं आहे.

काल शनिवारी जलालाबादवर ताबा मिळवल्यानंतर काबुल हेच ऐकमेव मोठे शहर तालिबानच्या हातात आलेले नव्हते. हे शहर तालिबान दहशतवाद्यांपासून सुरक्षित असल्याचे मानेल जात होते, परंतु तालिबानचे समर्थक आपल्या सर्व शक्तिनिशी काबूल शहरावर जोरदार हल्ला करीत शहरात धडकले. त्यानंतर मात्र तेथील अधिकृत सैन्याचा तालिबानने अकरक्षः धुव्वा उडवत शहर काबीज केले आहे.

अफगाणिस्तानामध्ये तालिबानचा कोणाचाही बदला घेण्याच्या हेतू नसून देशातील नागरिकांचा जीव आणि त्यांची संपत्ती सुरक्षित आहे, याची मी सर्वांना खात्री देतो. आम्ही अफगाणिस्तानच्या जनतेचे सेवक आहोत, असे तालिबान संघटनेचे प्रवक्ते सुहैल शाहीनने सांगितले आहे.

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.