तालिबान्यांनी जारी केले नागरिकांवर निर्बंध, ‘या’ गोष्टींना असेल बंदी

0

- Advertisement -

काबूल: अफगाणिस्तानातील राजकीय तख्ता पलट झाल्यानंतर तालिबान संघटनेने नागरिकांना सवलती देण्यात येतील तसेच सरकारी सार्वजनिक आणि कठोर कायदे लागू होणार नाहीत असे म्हटले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र अफगाणिस्तानच्या अनेक राज्यांत मानवाधिकारांचे उल्लंघन आणि लोकांशी असह्य वागणुकीच्या घटनांच्या बातम्या येत आहेत. तालिबानने इस्लामिक कायद्याच्या व्याख्येचे उल्लंघन आहे असे कारण देत अफगाणिस्तानच्या हेलमंद प्रांतात न्हाव्यांना दाढी कापण्यास किंवा लहान करण्यास बंदी घातली आहे.

तालिबानचे म्हणणे आहे की जो कोणीही या नियमाचे उल्लंघन करेल त्याला कठोर शिक्षा केली जाईल. या वर्षी 15 ऑगस्ट रोजी सत्तेवर आल्यापासून तालिबान राजवटीने महिला, अफगाण संस्कृती आणि पारंपारिक मनोरंजन कार्यक्रमांच्या विरोधात अनेक आदेश जारी केले आहेत.

IPL वर असेल बंदी

यूएई आयपीएल 2021 मध्ये दुसऱ्या टप्प्या सुरु असतानाच अफगाणिस्तान हा जगातील एकमेव देश आहे, जेथे आयपीएलचे सामने प्रसारित केले जात नाहीत. तालिबान सरकारने आयपीएलला इस्लामच्या विरोधात बेकायदेशीर ठरविले असून मुख्यत्वे चीअरलीडर्स आणि स्टेडियममधील चेहरा आणि डोके उघडे ठेवून वावरणा-या महिलांचे वर्तन हे इस्लामिक कायद्याच्या विरुद्ध असल्याचे म्हटले आहे.  त्यामुळे आयपीएल लीग सामन्यांच्या प्रसारणावर बंदी तेथे घातली आहे.

संगीतावर घालण्यात आलीय या आधीच बंदी

- Advertisement -

तालिबानने कंदहार प्रांतात दूरचित्रवाणी आणि रेडिओ वरील संगीत आणि महिलांचे आवाज ऐकण्यास बंदी घातली आहे. तालिबानने 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर काही माध्यम संस्थांनी त्यांच्या महिला सुत्रसंचालकांना काढून टाकले होते. सत्ता मिळवल्यावर एका महिन्यातच, देशात संगीत गायबच झाले आहे.

 महिला क्रिकेट संघ आणि पतंग उडवण्यावरही बंदी

एवढेच नव्हे तर कट्टरपंथी इस्लामिक गटाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार , तालिबानच्या नव्या सरकारच्या अंतर्गत असलेल्या एका अफगाण महिला राष्ट्रीय महिला क्रिकेट संघावरही हा खेळ खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे उपप्रमुख अहमदुल्लाह वासिक यांनी एका मुलाखतीत सांगितले की, महिलांच्या खेळाला योग्य किंवा आवश्यक मानले जात नाही.  आम्हाला असे वाटत नाही की महिलांना क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली जाईल , कारण महिलांनी क्रिकेट खेळणे आवश्यक नाही, असे ते म्हणाले आहेत.

तसेच तालिबानने देशातील तरुण प्रार्थना आणि इतर धार्मिक कार्यांपासून विचलित होऊ शकतात या कारणावरून त्यांचे पतंग उडवणे देखील बेकायदेशीर ठरवले आहे. तालिबानी सरकारच्या भीतीमुळे अफगाणिस्तानमध्ये पतंग व्यवसाय पूर्णपणे संपला आहे. या व्यतिरीक्तही अनेक निर्बंध तालिबान संघटनेने नागरिकांवर लादले आहेत.

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.