लस उत्पादनाचा वेग वाढणार….अमेरिकेने निर्बंध हटविले….

0

- Advertisement -

ऑक्सफोर्ड ऑस्ट्राझेन्का आणि भारतातील सिरम इन्स्टिट्यूट मिळून उत्पादन करीत असलेल्या कोव्हीडशिल्ड या लसीच्या उत्पादनासाठी लागणा-या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील निर्बंध भारताच्या विनंतीला प्रतिसाद देत अमेरीकेने उठविले आहेत. आता लस उत्पादनातील कच्चा माल अमेरीकेतून भारतात येण्यातील अडथळा दूर झाला आहे.

एप्रिल महीन्याच्या सुरवातीस सिरम संस्थेचे आदर पूनावाला यांनी थेट अमेरीकेच्या अध्यक्षांना ट्विट करून उत्पादनासाठी लागणा-या कच्च्या मालावरील निर्बंध उठविण्याची मागणी केली होती. चार दिवसांपुर्वी अमेरीकेने आम्ही अमेरीकेच्या नागरिकांच्या आरोग्यास प्रथम प्राधान्य असं जाहीर करीत निर्बंधाबद्दल बोलण्यास टाळले होते.

परंतु परंतु प्रभावशाली अनिवासी भारतीयांचा दबाव आणि भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व अमेरीकेचे सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांच्यात फोन वरून झालेल्या चर्चेला यश आले आहे.

- Advertisement -

अमेरीकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही रविवारी ट्विट करून, जसे कोरोना संकटाच्या काळात भारताने जसे अमेरीकेतील जनतेसाठी सहकार्य केले होते, त्याचा विचार करून भारतातील बिकट झालेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी नागरिकांच्या मदतीचे शक्य तेवढे सर्व प्रयत्न व मदत अमेरीकी प्रशासन करील असे म्हटले आहे.

अमेरीकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनीही अशाच प्रकारचे ट्विट करीत भारतातील नागरिकांसाठी शक्य तेवढी मदत पाठविण्याचे निर्देश अमेरीकेतील प्रशासनास दिले असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच व्हाईट हाऊसने भारताला सहकार्य करीत असल्याचे एक निवेदन प्रसारीत केले आहे.

दरम्यान 318 ऑक्सिजन कॅान्सन्ट्रेटर्स इतर तातडीची वैद्यकिय उपकरणांसह एअर इंडियाचे विमान न्युयार्क येथील जेएफके विमानतळावरून भारतात रवाना झाले असल्याची माहीती वृत्तसंस्थांनी दिली आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.